वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली
शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून आलेल्या टीम इंडियाला मुंबई विमानतळावर विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय झाला. टीम इंडियाचे पुढचे सामने चेन्नईला होणार आहे. त्याआधी खेळाडू यांना कुटुंब समवेत काही वेळ घालवायचा होता.
कांगारूंना त्यांच्याच भूमीत लोळवून टीम इंडिया परतली. सकाळी मुंबई आणि नवी दिल्ली विमानतळावर भारतीय विजेत्या टीमचं आगमन झालं. ब्रिस्बेन कसोटी नाट्यमयरित्या जिंकत भारताने गावस्कर बॉर्डर ट्रॉफी ऐतिहासिकरित्या 2-1 ने जिंकली. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या टीमवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.