'हा' शरद पवारांचा दुटप्पीपणा,जनता राष्ट्रवादीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही : भातखळकर
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केला आहे. यारून भाजप नेते अतुल भातखळकरयांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. अतुल भातखळकर म्हणाले की, "धनंजय मुंडे यांच्यावरीव आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेऊ, अस म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असं म्हणत पाठिशी घालायचे, हा शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही", असा टोला भातखळकरांनी शरद पवारांना लगावला आहे.
सुरुवातीला शरद पवार माध्यमांसमोर म्हणाले होते की, "धनंजय मुंडेंवरील आरोप हे गंभीर आहेत, पक्षामध्ये चर्चा करून निर्यण घेण्यात येईल", असे पवार म्हणाले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रेणू शर्माच्या विरोधात विविध राजकीय व्यक्तींनी तक्रार केल्यानंतर शरद पवार म्हणाले की, "संबंधित महिलेवरही ब्लॅकमेलिंगचे आरोप झालेले आहेत. वेगळ्या विचारांचे आणि वेगळ्या भूमिकेचे लोक एका महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे संपूर्ण चौकशी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल", असे मत शरद पवार यांनी मांडले. यावरूनच अतुल भातखळकर यांनी टीका केली.