शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (15:13 IST)

विदुर नीती : ज्यांच्याकडे आहेत या 6 गोष्टी ते नशीबवान असतात

महात्मा विदुर हे महाभारतातील मुख्य पात्रांपैकी एक आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि नीतींना आजतायगत लोक मानतात. महात्मा विदुर हे दूरदर्शी आणि उत्तम जाणकार मानले जातात. त्यांच्या नीतींना अवलंबवून लोक जीवनात पुढे वाढतात. महात्मा विदुर ह्यांनी अशा 6 गोष्टींबद्दल सांगितले आहेत ज्या मुळे एखादा माणूस संसाराच्या सर्व सुखांचा आनंद घेतो. असं म्हटले जाते की ज्यांच्या कडे या 6 गोष्टी असतात ते फार नशीबवान असतात. जाणून घेऊ या की काय आहेत त्या 6 गोष्टी. ज्यामुळे एखाद्याचे नशीब उजळते.

1 विदुर नीतीनुसार, जे स्त्री आणि पुरुष नेहमी गोड बोलतात. त्यांच्यावर आई सरस्वती आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. शास्त्रानुसार, वाणीमध्ये आई सरस्वतीचा वास्तव्य असतो. असं म्हणतात की वाईट आणि कडू बोलणाऱ्याचा स्वभाव देखील त्यांच्याच प्रमाणे वाईट होतो. विदुरजी प्रमाणे गोड बोलणाऱ्या माणसाचे नशीब त्याचे साथ देतात. 
 
2 विदुर यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांचे मुलं आज्ञाकारी असावे. जे त्यांच्या कुळाचे नाव चमकवतील. विदुर म्हणतात की जर मुलं आज्ञाधारक नसतील तर ते संपूर्ण कुळाचा नायनाट करतात आणि ज्यांचे मुलं आज्ञाधारक असतात ते नेहमी सुखी आणि नशीबवान असतात.
 
3 विदुर म्हणतात की रोगांमुळे शरीर कमकुवत होतो. आजारी व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक क्षमता क्षीण होऊ लागते.तो काहीही काम चांगलं करू शकत नाही. वारंवार आजारी पडल्यामुळे तो पैशे देखील साचवू शकत नाही. व्यक्ती निरोगी असेल तर तो नशीबवान समजला जातो.
 
4 विदुर म्हणतात की माणसाजवळ ज्ञान ही एकमेव संपत्ती अशी आहे ज्याला कोणी चोरू शकत नाही. शास्त्रानुसार ज्ञान हे माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे. विदुरजी म्हणतात की ज्ञान कठीण काळात माणसाची साथ निभावतो. वर्तमान काळात ज्ञान हेच उत्पन्नाचे मोठे साधन आहे.
 
5 विदुर म्हणतात, की माणसाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्नाची साधने वाढवावी लागतात. ज्या माणसाकडे उत्पन्नाचे साधने नसतात त्याला दुर्देवी मानले जाते. पैसे नसलेल्या माणसाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या पुढे हात पसरवावे लागतात. विदुर म्हणतात की ज्या लोकांकडे उत्पन्नाचे साधने असतात, त्यांनी स्वतःला नशीबवान समजावं.
 
6 विदुर म्हणतात की एका यशस्वी माणसाच्या मागे नेहमी एका बाईचा हात असतो. असं म्हणतात की एक स्त्रीच आपल्या घराला स्वर्ग किंवा नरका मध्ये बदलू शकते. विदुर म्हणतात की ज्या माणसाची स्त्री चांगल्या स्वभाव आणि चांगल्या आचरणाची आहे तो माणूस खरोखरच नशीबवान असतो.