सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (14:10 IST)

कोरोना काळात महात्मा विदुर यांच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा

कठीण काळात आपण स्वतःला कशा प्रकारे वाचवू शकतो, या संदर्भात वेद, पुराण, रामायण आणि महाभारतात अनेक गोष्टी वाचायला मिळतात. त्यांना आपण आपल्या आचरणात अवलंब केल्यानं कोरोनाकाळात स्वतःला संरक्षित ठेवू शकता. कारण या काळात माणूस आरोग्य, अर्थ आणि नात्याच्या संकटाशी झुंझत आहे. अशा परिस्थितीत महात्मा विदुर यांचा 5 गोष्टींना लक्षात ठेवावे.
 
1 जगातील सहा प्रमुख सुख हे आहेत - धनप्राप्ती, नेहमी निरोगी राहणं, आज्ञाकारी मुलं, प्रिय पत्नी, चांगली आणि प्रेमळ बोलणारी पत्नी, मनोरथ सिद्ध करणारे ज्ञान या सहा गोष्टींमुळे जगात सुख मिळतं. या साठी आपण संयम बाळगून प्रेमळ मार्गाने जे काही प्रयत्न करावयाचे असेल ते करावं.
 
2 काम, क्रोध आणि लोभ हे तीन प्रकाराचे नरक म्हणजे दुःखाकडे जाण्याचे मार्ग आहे. हे तिन्ही आत्म्याचा नाश करणारे आहेत. या पासून नेहमी दूर राहावे. काम, क्रोध आणि लोभ हे आत्म्याचा नाश करणारे नरकचे दार आहेत, म्हणून या तिघांचा त्याग करावा. हे असे वाईट आचरण आहे जे आपल्या नात्या संबंधात, व्यवसायात आणि नोकरीत नुकसान करतात.
 
3 मत्सर, दुसऱ्याचा द्वेष करणारे, असमाधानी, राग करणारे, शंकेखोर आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे व्यक्ती नेहमी दुखी राहतात. आजच्या काळात दुसऱ्यांवर अवलंबून राहणे म्हणजे सर्वात मोठा दुःख आहे. म्हणून मत्सर करण्याऐवजी निरोगी सकारात्मक प्रेरणा घेऊन स्पर्धा केली पाहिजे. असमाधानी राहण्या ऐवजी समाधान कशाने मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न करावे. राग करणे आणि शंकेखोर बनून राहण्याने आपले सर्व संबंध तुटतात. म्हणून नेहमी प्रेम आणि विश्वास ठेवायला शिका. कोणा विषयी आसक्ती बाळगू नका. प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगू द्या. 
 
4 मनुष्य हा नेहमी एकटाच पाप करतो आणि बाकीचे त्याचा आनंद घेतात. आनंद घेणारे तर वाचून जातात पण पाप करणारा नेहमीच त्या पापाचा दोषी असतो. या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला आपल्या केलेल्या कर्माची किंमत मोजावीच लागते. कर्माचे सिद्धांत क्रूर आहे. आपण कोणत्याही प्रकाराचे पाप करण्यापासून वाचाल याची काहीच शाश्वती नाही. आपण केलेल्या पापाचे आनंद दुसऱ्यांनी घ्यावे आणि त्याची शिक्षा आपण भोगावी हे समजणं जरुरी आहे.
 
5 भरतश्रेष्ठ! आई, वडील, अग्नी, आत्मा आणि गुरु - माणसाला यांची सेवा करावी जर आपण यांची सेवा केली नाही आणि यांचा आदर केला नाही तर नक्कीच आपल्या आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आत्मा म्हणजे स्वतःची सेवा करणे, आपल्याला शरीराला आणि मनाला निरोगी ठेवणे.