रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (09:57 IST)

भारतीय सैन्यात 10 वी आणि 12 वी पास लोकांसाठी शिपाई जीडी आणि क्लार्कची भरती

भारतीय सैन्य भरती मेळावा हिमाचल च्या हमीरपुर, बिलासपूर आणि ऊनाच्या तरुणांसाठी भारतीय सैन्यात भरती होण्याची चांगली संधी आहे. ऊना येथील इंदिरागांधी स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये 1 मार्च 2021 च्या दरम्यान सैन्य रॅली काढण्यात येईल. या रॅलीच्या माध्यमातून शिपाई(जीडी)आणि क्लार्क च्या पदांवर निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना joinindianarmy.nic.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तिथी 13 फेब्रुवारी 2021 आहे. 
 
प्रवेश पत्र 15 फेब्रुवारी 2021 पासून उमेदवारांना ईमेल करण्यात येईल.

शिपाई- जनरल ड्युटी 
वय मर्यादा- 17 ½ -21 वर्ष (ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 99 ते 1 एप्रिल 2003 च्या दरम्यान झाला आहे). किमान 45% गुणा सह 10 वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात 33 टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे. 
 
शिपाई क्लार्क -
वय मर्यादा- 17 ½ -23 वर्ष(ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 1 एप्रिल 2003 दरम्यान झाला असावा).
किमान 60 टक्के अंकांसह कोणत्याही विषयात 12 वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.  12 वी मध्ये इंग्रजी आणि गणित/अकाउंट्स/बुककीपिंग मध्ये 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 
निवड - 
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) आणि लेखी परीक्षा. 
लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल.
 
भरती रॅली मध्ये ही कागदपत्र आणावयास विसरू नका-
* प्रवेश पत्र 
* मुळजातीचे प्रमाण पत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र फोटोकॉपीच्या दोन प्रतसह.
 फोटोच्या 20 प्रत. फोटो तीन महिन्यापेक्षा जास्त जुने असू नये.
* डोमेसाइल प्रमाणपत्र.