सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (09:25 IST)

संयुक्त राज्य कृषी सेवा परीक्षा : 564 पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

UPPSC Recruitment 2020: वर्ष 2020 जात आहे त्यापूर्वी उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाने 564 पदांसाठी संयुक्त राज्य कृषी सेवा परीक्षा 2020 ची अधिसूचना जारी केली आहे. मंगळवार पासून 7 प्रकारच्या 564 पदांसाठी अर्ज सुरू झाले आहे. उमेदवार आता आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन uppsc.up.nic.in भरती अधिसूचना तपासू शकतात किंवा खालील दिलेल्या थेट लिंक वरून अधिसूचना तपासू शकतात.

या अंतर्गत जिल्हा उद्यान अधिकारी,प्रधानाचार्य राज्य खाद्य विज्ञान प्रशिक्षण, वरिष्ठ प्राविधिक(शस्य शाखा),वरिष्ठ प्राविधिक (वनस्पती शाखा),वरिष्ठ प्राविधिक(वनस्पती संरक्षण खाता),वरिष्ठ प्राविधिक (रसायन शाखा) आणि वरिष्ठ प्राविधिक (विकास शाखा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज 29 डिसेंबर 2020 पासून सुरू झाले आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख आयोगाकडून 25 जानेवारी 2021 आणि ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवट ची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. या साठी उमेदवारांची वयो मर्यादा 21 ते 40 वर्ष असावी. 
 
आत्ता पर्यंत या पदांवर भरती पीसीएस परीक्षेच्या माध्यमाने केली जात होती पण यंदा प्रथमच पदांची संख्या जास्त असल्याने पदांसाठी वेगळ्याने संयुक्त राज्य कृषी सेवा परीक्षा 2020 चे आयोजन केले जात आहे. भरतीची सविस्तर जाहिरात आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.परीक्षांची तारीख आयोगाने अद्याप जाहीर केली नाही. उमेदवारांनी अर्जाच्या सूचना आणि पूर्ण अधिसूचनांना वाचल्यावरच अर्ज करावा.
 
भरती अधिसूचना - संयुक्त राज्य कृषी सेवा परीक्षा 2020 या http://uppsc.up.nic.in/CandidateHomePage.html संकेत स्थळावरून वाचावी.
 
या पदांवर लेखी परीक्षा आणि मुलाखत -
या परीक्षेसाठी रिक्त पदांच्या भरतीला दोन वर्गात ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये वाटले आहेत. ग्रुप ए च्या अंतर्गत येणाऱ्या पदांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखती या दोन्ही माध्यमातून केली जाईल. तर ग्रुप बी मध्ये पदांची निवड फक्त लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ग्रुप ए जिल्हा उद्यान अधिकारी श्रेणी 1 , श्रेणी 2 आणि प्रधानाचार्य राज्य विज्ञान प्रशिक्षण केंद्र -खाद्य प्रक्रिया अधिकारी श्रेणी 2 या पदांना ठेवण्यात आले आहे. ग्रुप बी मध्ये वरिष्ठ प्राविधिक(शस्य  शाखा), वरिष्ठ प्राविधिक (वनस्पती शाखा), वरिष्ठ प्राविधिक( वनस्पती संरक्षण शाखा),वरिष्ठ प्राविधिक(रसायन शाखा) आणि वरिष्ठ प्राविधिक(विकास शाखा) अशी पदे ठेवण्यात आली आहे. 
 
अर्जाची लिंक - या संकेत स्थळावर http://uppsc.up.nic.in/Notifications.aspx ऑनलाईन अर्ज करावे.
अर्ज फी - 
अनारक्षित -आर्थिक दृष्टीने दुर्बळ लोकांसाठी, इतर मागासवर्गीयांसाठी परीक्षा शुल्क 100 रुपये आणि ऑनलाईन प्रक्रिया शुल्क 25 रुपये आहे. 
अनुसूचित जाती, जमातींसाठी, माजी सैनिकांसाठी -परीक्षा शुल्क 40 रुपये, ऑनलाईन प्रक्रिया शुल्क 25 रुपये आहे.
दिव्यांगांसाठी - काही ही परीक्षा शुल्क नाही, केवळ ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे 25 रुपये आहे. 
अधिकृत संकेत स्थळ - uppsc.up.nic.in