राजभवनाकडून खुलासा प्रसिद्ध, राज्यपाल अनुपस्थितीची दिली होती पूर्वकल्पना

bhagat-singh-koshyari-
Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (22:34 IST)
मुंबईत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून देण्यात येणारे निवेदन स्वीकारण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित नसल्याने शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला. राज्यपालांनी वेळ देऊनही भेट नाकारल्याचा आरोप केला. मात्र राजभवनातून शेतकरी नेत्यांना पाठवण्यात आलेले एक पत्र समोर आले आहे. यात गोव्याच्या विधानसभेच्या सत्राला संबोधित करण्यासाठी राज्यपाल गोव्यात गेले असल्याने ते निवेदन स्वीकारण्यासाठी अनुपस्थिती असतील, असे राजभवनाकडून आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे.

याबाबत राज भवनाकडून देण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
यांचेकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिर‍िक्त कार्यभार आहे. दिनांक २५ जानेवारी रोजी ते गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला
संबोध‍ित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास
भेटू शकणार नाहीत, असे राज भवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते.

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे (9867693588)यांना दिंनांक २२ जानेवारी रोजी दूरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना दिनांक २४ जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धते बददल कळविण्यात आले होते.
शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेडडी यांना या बाबतचे लेखी पत्र दिनांक २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले
होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला
भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राज भवनातून स्पष्ट करण्यात येत आहे, असे राज भवनाकडून पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास महागणार

इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास महागणार
इंधनाच्या दरवाढीमुळे एसटी प्रवास करणाऱ्यांसुद्धा यापासून सुटका मिळणार नसल्याचं चित्र दिसत ...

कोरोना महामारीने भारतातील लोकांचे वय 2 वर्षांनी कमी केले! ...

कोरोना महामारीने भारतातील लोकांचे वय 2 वर्षांनी कमी केले! IIPS च्या अभ्यासात धक्कादायक दावा करण्यात आला आहे
कोरोना महामारीमुळे भारतातील आयुर्मान जवळपास दोन वर्षांनी कमी झाले आहे. मुंबईतील इंटरनॅशनल ...

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लिलावती ...

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी ...

आता ऑनलाईन मोबाईल रिचार्ज महाग झाला, PhonePe ने UPI ...

आता ऑनलाईन मोबाईल रिचार्ज महाग झाला, PhonePe ने UPI व्यवहारांवर प्रोसेसिंग फीसची सुरुवात
PhonePe processing fees : जर तुम्ही PhonePe ने मोबाईल रिचार्ज केला तर वॉलमार्ट ग्रुपच्या ...

दिल्लीत डेंग्यूचा कहर

दिल्लीत डेंग्यूचा कहर
राजधानी दिल्लीत कोरोनानंतर आता डेंग्यूने कहर केला आहे. परिस्थिती अशी आहे की आता रुग्णांना ...