शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (22:46 IST)

खडसे यांना दिलासा, तोपर्यंत ईडी अटक करण्याची कारवाई करणार नाही

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली. सदरची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, तो तोपर्यंत आपण खडसे यांना अटक करण्याची कारवाई करणार नाही, अस ईडीच्या वकिलांनी हायकोर्टाकडे स्पष्ट केलं. 
 
एकनाथ खडसे यांच्या विरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे. खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मंत्री असताना खडसेंनी कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबीने केला होता. यानंतर तपास झाल्यावर याबाबत गुन्हा घडला असल्याचं आढळून येत नसल्याने एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. आता याच प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडीने खडसे यांची चौकशीही केली. मात्र, त्यांना चौकशीसाठी पुन्हा यावं लागेल, अस सांगण्यात आलं होतं. यामुळे ईडी आपल्याला अटक करू शकते, असं खडसे यांना वाटल. यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात आपल्या विरोधात ईडीने दाखल केलेला ECIR रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे.