मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (17:20 IST)

या 3 स्टेप्सचा वापर करून आपण उबदार कपड्यांना स्टोअर करू शकता.

हिवाळा संपल्यावर कपड्यांना सांभाळून कसं ठेवायचे हा प्रश्न उद्भवतो. तर काळजी नसावी काही असे टिप्स घेऊन आलो आहोत ज्यांच्या मदतीने आपण उबदार कपड्यांना सहजपणे साठवून ठेवू शकता. बऱ्याचशा बायका माहिती नसल्यामुळे उबदार कपड्यांना न धुता तसेच ठेवून देतात. या मुळे कपड्यातून वास येतो, उबदार कपडे खराब होतात आणि कपड्यांमध्ये कीटक लागतात. या मुळे कपडे खराब होतात. म्हणून कपड्यांना कसं ठेवायचं या बद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या उबदार कपड्यांना संग्रहित करण्याचे सोपे उपाय.
 
1  कपड्यांना धुऊन ठेवा -
उबदार कपड्यांना कपाटात ठेवण्यापूर्वी त्यांना धुऊन ठेवणं गरजेचं आहे. असं न केल्यानं उबदार कपड्यांना नुकसान होऊ शकतं.उबदार कपड्यांना धुण्यासाठी सौम्य डिटर्जंट वापरा या साठी काही वेळ डिटर्जंट मध्ये कपडे भिजवून ठेवा. या मुळे कपडे स्वच्छ होतात.जर आपण उबदार कपड्यांना वाशिंग मशीन मध्ये धुवत असाल तर वूल सेटिंग वापरा. जर आपल्या कडील मशीन मध्ये वूल सेटिंग नाही तर आपण जेंटल वॉश चा वापर करून कपड्यांना धुऊन घ्या. तसेच कपड्यांना मऊ आणि सुवासिक ठेवण्यासाठी फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर करावा.
 
2 कपड्यांना उन्हात वाळवा-
बहुतेक बायकांची सवय असते की त्या उबदार कपड्यांना विशेषतः स्वेटर वाळत घालण्यासाठी हँगर वापरतात. पण असं केल्यानं कपडे लोंबकळतात. म्हणून उबदार कपडे वाळत घालण्यासाठी हँगर वापरू नये. तर तीव्र सूर्यप्रकाशात त्यांना दोरीवर वाळत घाला. असं केल्यानं कपड्यामधील जंत देखील मरतात.
 
3 कपाटात किंवा पेटीमध्ये ठेवा - 
कपडे पूर्णपणे वाळल्यावर त्यांना हवाबंद पेटीत ठेवा. परंतु  ज्या कपाटात किंवा पेटीमध्ये ठेवायचं आहे,त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. आता पेटीमध्ये कडुलिंबाचे वाळके पान घाला आणि त्याच्या वर वर्तमानपत्रे ठेवा. असं केल्यानं उबदार कपड्यांमध्ये ओलावा राहत नाही. उबदार कपडे संरक्षित ठेवण्यासाठी ही एक पद्धत आहे. की उबदार कापडं मलमली कपड्यात गुंडाळून ठेवा. असं केल्यानं कपड्यात ओलावा येणार नाही. उबदार कापडं बऱ्याच काळासाठी साठवून ठेवायचं असेल तर नैफ्थलीनच्या गोळ्यांना लहान-लहान पोटोळ्या मध्ये बांधून ठेवा किंवा हे नैफ्थलीनच्या गोळ्या कपाटात किंवा पेटीमध्ये ज्यामध्ये कापडं ठेवत आहात, त्याच्या कोपऱ्यात ठेवून द्या. असं केल्यानं कपड्यातून वास येणार नाही. 
 
या तीन सोप्या टिप्स अवलंबवून आपण उबदार कापडं पुढील वर्षा पर्यंत सहजपणे सुरक्षित ठेवू शकता.