बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (20:21 IST)

काय सांगता, केळीच्या सालींचा असा उपयोग होऊ शकतो

केळीचे साल आपण केळी खाल्ल्यावर लगेचच कचरा कुंडीमध्ये टाकून देतो जेणे करून त्यावरून पाय घसरून कोणालाही दुखापत होऊ नये. पण केळी चे साल सांभाळून ठेवले तर हे खूप उपयुक्त आहे. हे साल आपल्या दैनंदिनीच्या कामात देखील उपयोगी पडतात.
केळी च्या सालांचा उपयोग कसा काय करता येतो चला जाणून घेऊ या. 

* बुटांना स्वच्छ करण्यासाठी -
बऱ्याच वेळा आपण बाहेर जाण्यासाठी निघतो तेव्हा लक्षात येत की आपण बूट स्वच्छ केले नाही. किंवा बऱ्याच वेळा बूट पॉलिश करण्यासाठी पॉलिश संपलेले असते. अशा परिस्थितीत आपण केळीच्या साहाय्याने चामडी किंवा इतर कोणतेही बूट पॉलिश करू शकता. केळीच्या सालींनी बूट पॉलिश केल्यावर त्यांना कपड्याने पुसून काढा.
 
*भांडी चकचकीत करण्यासाठी -
आपल्या घरात चांदीची किंवा स्टीलची भांडी असल्यास  ते जुनाट दिसतात त्यांना केळीच्या सालीच्या साहाय्याने उजळवू शकता. केळीच्या सालींमध्ये तेल आणि पोटॅशियम आढळते, ज्यामुळे कोणत्याही धातूची भांडी सहजपणे स्वच्छ करता येतात. केळीचे साली मिक्सरमध्ये वाटून पाणी घालून त्याची पेस्ट बनवा.ही पेस्ट धातूवर लावून गरम पाण्याने धुऊन घ्या. असं केल्याने भांडी चकचकीत होतात.
 
* स्मूदी मध्ये घाला- 
आपण आपल्या आवडत्या स्मूदी मध्ये देखील केळीचे साली घालू शकता.केळीच्या सालीं मध्ये फायबर, पोटॅशियम,अँटीऑक्सीडेंट,ल्युटीन आणि व्हिटॅमिन आढळते. केळीचे साली पाण्यात उकळवून,साली व्यवस्थितरीत्या स्वच्छ करून मिक्सर मध्ये वाटून घ्या नंतर हे स्मूदी मध्ये मिसळा. असं केल्याने स्मूदी चविष्ट होण्यासह पोषक घटकांनी समृद्ध असेल.
 
* माती मध्ये घाला-
जर आपल्याला केळीची साली कुठे टाकायचे असेल तर ते मातीत घाला.आपल्या बागेच्या मातीत साली घातल्यानं झाडांना पोटॅशियम , कॅल्शियम,सोडियम,सल्फर इत्यादी मिळत.या मुळे झाडांची वाढ जलद होते.केळीचे साली तुकडे करून झाडात मिसळा. जर आपण संपूर्ण साल मातीत घातले तर ते लवकर आपला प्रभाव टाकत नाही.