बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:25 IST)

स्तनाचा आकार कमी करण्यासाठी घरगुती सोपे उपाय

सुंदर आणि आकर्षक शरीरयेष्टी हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. त्यात महिलांच्या शरीरातील महत्त्वाचं अवयव म्हणजे स्तन. स्तनाचा योग्य आकार आरोग्य आणि आकर्षण या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा असतो. अती लहान आकाराचे स्तन किंवा अती भरलेले स्तन चांगले दिसत नाही. अनेकदा स्तनाचा आकार अधिक असल्यामुळे कोणतेही कपडे परिधान करणे अवघड होतं. अनेक स्त्रिया यासाठी शस्त्रक्रिया किंवा औषधांचंही सेवन करतात परंतू त्याचे दुष्परिणाम दिसून येतात अशात आम्ही आपल्या काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याने योग्य तो आकार मिळू शकेल.
 
फॅट युक्त पदार्थ खाणे टाळा.
निरोगी जीवनशैली स्वीकारा
व्यसन टाळा.
सफरचंद, केळी आणि द्राक्षे आहरात सामील करा.
ग्रीन टीमुळे देखील अतिरिक्त चरबी घटते.
गोमुखासन आणि सूर्यनमस्कार घातल्याने फायदा जाणवेल.
 
हे करुन बघा-
कडुलिंबाची 15-20 पाने 3-4 कप पाण्यात उकळवून घ्या. दहा मिनिटे तसेच राहू द्या. आता त्यात 2 चमचे हळद आणि जरा मध मिसळून घोळून घ्या. पुन्हा हलकं गरम करुन प्या. काही दिवस असे केल्याने परिणाम दिसून येतील.