रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (17:05 IST)

घरातील फर्नीचर असे ठेवा

घर सजावटीमध्ये फर्निचर, पुस्तकांची ठिकाणे आणि घरांचे पडदे याला खूप महत्त्व असते. हे नीटनेटके ठेवले तर घराचा माहोलच बदलून जातो. घर एकदम सुंदर आणि नीटनेटके वाटून घराला चांगला लूक येतो. त्यासाठी काही खालील गोष्टींचे पालन केल्यास सुंदर घर ही कल्पना सत्यात उतरते.
 
पडद्यांची निवड करताना फार डिझाईन्सचं कापड न घेता प्लेन, आवडत्या रंगांचं कापड घ्यावं. सध्या कॉटनचे तयार पडदे बाजारात आकर्षक रंगात मिळतात व ते स्वस्तही असतात आणि सुंदर दिसतात. खोलीतील खिडक्यांचीही उंची कमी?
 
अधिक असली तरी सर्व पडदे जमिनीपर्यंत जाणारे पूर्ण उंचीचेच घ्यावेत, म्हणजे खिडक्यांमधील उंचीतील फरक झाकला 
 
जातो व खोलीही उंच वाटते. आजकाल पडद्यांऐवजी रोलर ब्लाईंड, वेनेशियन ब्लाईंट असे अनेक प्रकार मिळतात जे खिडकीच्या फ्रेमच्या आत बसतात. दिवाण किंवा सोफ्याच्या मागे लागून खिडकी येत असेल तर यांचा उपयोग चांगला होतो.