मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:34 IST)

कपड्यावरून लिपस्टिकचे डाग हटविण्यासाठी 3 हॅक्स

how to remove lipstick stain from clothes
लिक्विड डिटर्जेंट
हा अत्यंत सोपा उपाय आहे. यासाठी आपल्याला सर्वात आधी कमी टोक असलेला चाकू घेऊन कपड्यावरून अतिरिक्त लिपस्टिक स्क्रॅप करायची आहे. नंतर डागावर थोडेसे लिक्विड डिटर्जेंट टाकून दहा मिनिटासाठी तसेच राहू द्यायचे आहे. आता कपडा रब न करता गरम पाण्यातून काढावा. डाग घासल्याने कपड्याचे नुकसान होऊ शकतं. एकदा डाग निघाल्यावर डिटर्जेंट आणि कपड्यावर दिलेल्या निर्देशानुसार कपडा धुऊन घ्यावा. 
 
हेअरस्प्रे
आपल्याला बहुतेकच माहीत असेल की हेअर स्प्रेच्या मदतीने कपड्यावरील लिपस्टिकचे डाग सोप्यारीत्या हटवता येऊ शकतात. यासाठी आपण डागावर हेअरस्प्रे करा आणि दहा मिनिटासाठी तसेच राहू द्या. नंतर दुसर्‍या नरम कपड्याने डाग सोडवण्याचा प्रयत्न करावा.
 
अल्कोहल
लिपस्टिकचा डाग हटविण्यासाठी सर्वात आधी एक स्वच्छ हलक्या रंगाचा कपडा घ्या आणि त्याला अल्कोहलमध्ये भिजवा. आता या कपड्याने डाग स्वच्छ करा. आपल्याला कपडा घासायचा नाही. एकदा डाग निघाल्यावर कपडा थंड पाण्यातून काढून घ्या. नंतर कपड्याला सामान्य कपड्याप्रमाणे धुऊन घ्या.