रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (15:47 IST)

हातावर सॅनिटायझरचा अधिक वापर हानिकारक

आजकाल हातांना साबणाने धुण्याऐवजी सॅनिटायझर जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे. हाताचे सॅनिटायझर कीटक आणि जिवाणूंना आपल्या हातावरून काढून टाकतात, त्याच बरोबर हे वापरल्यानंतर आपल्या हाताला चांगला सुवास येतो, पण काही काही लोकांना परत परत हात धुण्याची सवय असते. 
 
प्रत्येक लहान आणि मोठ्या कामामध्ये हात घातल्यावर त्यांना असे वाटते की आपले हात चांगल्या प्रकारे पाण्याने स्वच्छ होणार नाही, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सॅनिटायझरचा वापर करत असतात. 
 
पण काय आपणास ठाऊक आहे की हाताचे सॅनिटायझरचा जास्त वापरणे हानीप्रद ठरू शकतं. 
 
1 हातातील सॅनिटायझरमध्ये ट्रायक्लोसॅन नावाचं रसायन आढळतं, ज्याने हाताची त्वचा शोषली जाते. ह्याला जास्त वापरल्याने हे रसायन आपल्या त्वचेमधून रक्तामध्ये मिसळते. रक्तामध्ये मिसळल्यावर ते आपल्या स्नायूंच्या आर्डिनेशनला नुकसान करते.
 
2 हाताच्या सॅनिटायझरमध्ये विषारी घटक आणि बेंजाल्कोनियम क्लोराइड असतं जे कीटक आणि जिवाणूंना हातामधून बाहेर काढून देतं, पण हे आपल्या त्वचेसाठी चांगलं  नसतं. यामुळे त्वचेची जळजळ आणि खाज सुटण्या सारखे त्रास उद्भवतात.
 
3 सॅनिटायझरच्या सुवासासाठी फॅथलेट्स नावाचं रसायन वापरण्यात येतात. याचे प्रमाण ज्या सॅनिटायझरमध्ये जास्त असतात ते आपल्यासाठी हानीप्रद असतात. अश्या प्रकाराच्या जास्त सुवासिक असलेले सॅनिटायझर यकृत, मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुसे आणि प्रजनन तंत्राला हानी करतं.
 
4 सॅनिटायझरमध्ये अल्कोहल जास्त प्रमाणात असल्यामुळे हे लहान मुलांच्या आरोग्यास वाईट परिणाम करतं, विशेषतः ज्यावेळी लहान मुलं याला नकळत गिळतात. 
 
5 हे जास्त प्रमाणात वापरल्याने त्वचा कोरडी पडते.
 
6 बऱ्याच संशोधनाच्या मतानुसार याचा जास्त वापर मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी करतं.