रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (20:48 IST)

रात्री उशिरा जेवण्याची सवय असल्यास नक्की वाचा

सध्या कोरोनाने थैमान घातले असून अनेक लोक घरी राहून कामं करत आहे. अशात प्रत्येकाचे वेळापत्रक बदलले आहेत आणि आपल्यापैकी बरेच लोक अशे आहे की जे आता आरामशीर आपली कामे करण्याला पसंती देत आहेत. त्यांना असे वाटते की त्यांना आता जायचं कुठे आहेत, तर सर्व कामे सहजरीत्या करता येऊ शकतं. 
 
पण अशात जर आपण रात्रीचे जेवण सुद्धा आरामात करत असाल म्हणजे की रात्रीचं जेवण देखील उशिरा करत असाल तर हे आपल्या आरोग्यास हानीप्रद होऊ शकतं. जर आपण देखील हे नित्यक्रम राबवत असलास तर एकदा त्यापासून होणाऱ्या नुकसानांवर एक दृष्टी टाका.
 
1 वजन वाढतं - 
रात्री शरीराची (चयापचय) मेटाबॉलिझम दिवसापेक्षा हळू आणि कमकुवत राहतं यामुळे रात्री उशिरा खाल्ल्याने ते पचायला जड होतं. तसेच रात्री जास्त प्रमाणात कॅलरी जळत नाही आणि वजन वाढतं.
 
2 रक्तदाब वाढतं -
बऱ्याच तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवल्याने उच्च रक्तदाबा बरोबरच रक्तामधील साखरेची पातळी देखील वाढते. जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते.
 
3 झोप गडबडते - 
एका अहवालानुसार रात्री उशिरा स्नेक्स किंवा जेवण केल्याने झोपेच्या चक्राच्या त्रास होतो. आणि पुरेशी झोप होतं नाही. ज्यामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवू शकतात. त्याच बरोबर गॅस्ट्रिक सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. 
 
4 चिडचिडेपणा -
आपली पुरेशी झोप घेऊ शकत नसल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर ही होतो. त्यामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही, त्याचा परिणाम चिडचिड होते.