मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By वृजेंद्र सिंह झाला|
Last Modified गुरूवार, 28 मे 2020 (12:03 IST)

डॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावं, जाणून घ्या

कोविड 19  म्हणजेच कोरोना व्हायरसवर अद्याप लस सापडली नाही तसेच औषधही सापडलेले नाही. अशात या महामारीपासून बचाव हाच एकमेव उपाय दिसत आहे. न घाबरता, जागरूक राहून लहान लहान सावधगिरी बाळगून आपण जलद गतीने पसरणाऱ्या या विषाणूपासून स्वत:चे रक्षण करू शकतो.
 
आपण आपल्या जीवनशैलीत कोणत्या प्रकारे बदल घडवून आणू शकतो. कोणत्या प्रकाराच्या खबरदाऱ्या आपण घेऊ शकतो? जेणे करून कोरोना पासून वाचता येईल. हेच सांगत आहे इंदूरच्या कोविड -19  रुग्णालय चोइथरामचे ICU आणि क्रिटिकल केयर विभागाध्यक्ष आणि चीफ कन्सलटंट इंटेसिव्हिस्ट डॉ. आनंद सांघी.
 
डॉ. आनंद सांघी यांनी वेबदुनियाशी विशेष संवाद साधताना सांगितले की कोरोनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या जीवनशैलीत बदल आणायला हवा. आपल्याला या व्हायरस बरोबर जगण्याची सवय लावावी लागणार. याची भीती बाळगण्याची गरज नाही. या रोगाला देखील इतर रोगांप्रमाणे घ्या. तथापि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
 
पूरक आहार : डॉ. सांघी म्हणाले की आपली रोग प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासह थकवा, पाय दुखणे, या साठी व्हिटॅमिन ए, सी, डी आणि व्हिटॅमिन बी 12 आणि झिंक इत्यादींची आपल्या शरीराला गरज असते. जे आपल्याला फळांमध्ये पुरेसे मिळतात. याच बरोबर व्हिटॅमिन्ससाठी देखील पूरक (सप्लिमेंट) वापरलं जाऊ शकतं. 
 
ICMR प्रोटोकॉल च्या अंतर्गत रुग्णालयात देखील हे सप्लिमेंट पुरवले जात आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की कोणते ही सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ला शिवाय घेऊ नये. कारणं डॉक्टर संपूर्ण तपासणी नंतर हे घेण्याचे सल्ले देतात.
 
काय खावे : डॉक्टर सांघी म्हणाले की हंगामी भाजी आणि हंगामी फळ खावे. विशेषतः संत्री, मोसंबी, खरबूज, इ. वापरावे. या मध्ये पुरेसे प्रमाणात व्हिटॅमिन असतात. फळ वापरण्याचा आधी खाण्याचा सोडा किंवा मिठाच्या पाण्यात काही वेळा टाकून ठेवावे. याच बरोबर आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आलं, हळदीचा वापर देखील करू शकता. हळद दुधासोबत देखील घेऊ शकता.
 
परंपरेकडे वळू या : डॉ. सांघी म्हणाले की आधुनिकतेच्या चकाकीत आपण आपल्या परंपरेला विसरत जात आहोत. उदाहरणार्थ आधीच्या काळात लोकं घरात शिरण्याचा आधी आपले हात पाय स्वच्छ धुवायचे, आपले पादत्राणे घराच्या बाहेरच काढायचे. या सवयी परत आपल्याला जीवनात आत्मसात कराव्या लागणार. याच बरोबर नियमाने व्यायाम करायला हवं. प्राणायाम करावे. प्राणायाम केल्याने आपले फुफ्फुसे आणि श्वसन तंत्र बळकट होईल.
 
शेवटी काही दररोज कामास येणार्‍या टिपा : साबणाने आपले हात किमान 20 सेकंदासाठी चोळून धुवावे. असे केल्याने व्हायरसचा प्रथिन एन्व्हलप तोडला जातो. गुळण्या करा, जास्तीत जास्त गरम वस्तूंचे सेवन करा. कामासाठी बाहेर जावे लागलेच तर ते घातलेले कापडं परत वापरू नका. त्यांना आधी गरम पाण्यात धुऊन घ्या किंवा कमीत कमी 1 दिवस तरी त्यांना उन्हात ठेवा. नंतरच त्यांचा वापर करायला हवं. आपल्या डोळे, नाक आणि तोंडाला सुरक्षित ठेवावे. मास्कच्या बरोबर चष्मा देखील वापरा.