देशात कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के
देशात कोरोना रुग्ण आता झपाट्याने बरे होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. मार्च महिन्यामध्ये ७.१ टक्के रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण होते. ते आता वाढून रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के इतका झाला आहे. देशातील कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहे. आतापर्यंत ६० हजार ४९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारत देशाची स्थिती चांगली असून मृत्यू दर देखील कमी आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या देखील इतर देशाच्या तुलनेत कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
देशात ज्यावेळी पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणे ७ टक्के इतके होते.
दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळी हे प्रमाण ११.२४ टक्के झाले होते.
तर तिसऱ्या लॉकडाऊनच्या वेळी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण २६.५९ टक्के झाले होते.
विशेष म्हणजे चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४१.६१ टक्के झाले आहे.
इतर देशात मृत्यूचे प्रमाण आतापर्यंत प्रत लाख लोकसंख्येमध्ये ४.४ आहे. तर आपल्या देशात दर लाख लोकसंख्येत ०.३ टक्के आहे.
आपल्याकडे प्रति लाख लोकसंख्येत १०.७ टक्के लोक कोरोनाबाधित आहेत.
मृत्यूदरातही देशात सुधारणा झाली असून पूर्वी मृत्यूचे प्रमाण ३.०३ टक्के होते. जे आता वाढून २.८७ झाले आहे.
देशात एकूण ६१२ लॅब आहेत जिथे कोरोनाची तपासणी केली जाते.
यामध्ये ४३० लॅब या सरकारी आहेत. तर १८२ खासगी लॅब आहेत.
देशात सध्या दिवसाला सरासरी १.१ लाख कोरोनाच्या चाचण्या होत आहेत.