मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (15:32 IST)

पीपीई कीट निर्मितीमध्ये भारत जगात दुसरा

कोरोना व्हायरसच्या या लढाईत पीपीई कीट हे सुरक्षा कवच आहे. पीपीई कीट कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास महत्वाची भूमिका बजावत आहे. दोन महिन्यात सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला आहे. 
 
सरकारने गुरूवारी याबाबत माहिती दिली आहे की,भारत दोन महिन्यात सर्वात कमी वेळीत स्वतंत्र पीपीई कीट बनवणारा जगातील दुसरा निर्माता ठरला आहे. भारताच्या अगोदर चीन आहे ज्यांनी सर्वाधिक पीपीई कीटची निर्मिती केली आहे. 
 
पीपीई कीटच्या निर्मितीत आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याच कारणामुळे भारतात दोन महिन्यापेक्षा कमी काळात पीपीई सर्वाधिक तयार करणारा दुसरा निर्माता ठरला आहे. उत्कृष्ठ पीपीई कीटची निर्मिती ही उ्तकृष्ठ दर्जाच्या कंपनीकडेच दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना वॉरिअर्सना पीपीई कीट देण्यात येणार आहे.