सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मे 2020 (21:13 IST)

'हा' फोन Flipkart वरही उपलब्ध झाला

Redmi Note 8 Pro हा स्मार्टफोन आता इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुनही खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन Mi.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळवरच विक्रीसाठी उपलब्ध होता. पण आता हा फोन Flipkart वरही उपलब्ध झाला आहे. @RedmiIndia  या ट्विटर हँडलवरुन हा फोन आता फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. 
 
शाओमीने रेडमी नोट 8 सीरिजअंतर्गत रेडमी नोट 8 (Redmi Note 8) आणि रेडमी नोट 8 प्रो (Redmi Note 8 Pro) हे दोन फोन गेल्या वर्षी लाँच केले. नोट 8 सीरिजला भारतात उदंड प्रतिसाद मिळाला आणि लाँचिंगनंतर काही महिन्यांमध्येच या फोनची 1 कोटीहून अधिक विक्री झाली होती. 
किंमत अशी आहे : 
6GB रॅम + 64GB स्टोरेज – 15 हजार 999 रुपये, 
6GB रॅम + 128GB स्टोरेज – 16 हजार 999 रुपये
8GB रॅम + 128GB स्टोरेज – 18 हजार 999 रुपये