Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात उपलब्ध या समार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगनचा वापर करण्यात आला आहे. भारतात हा स्मार्टफोन 31 मार्च रोजी लाँच करण्यात येणार होता. लॉकडाऊन असल्याने या फोनची लाँचिंग पुढे ढकलली आहे.
फीचर्स
64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज
6.67 इंचाचा अमोलेड ट्रू कलर डिस्प्ले
वॉटरनॉच
ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर
अँड्रॉयड 10 वर कार्यरत
चार रियर कॅमेरे- पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कॅमेरा
4160 एमएएच क्षमतेची बॅटरी
ब्लू, ग्रीन, व्हाईट आणि ग्रे या चार रंगात उपलब्ध
वजन 192 ग्रॅम
किंमत
MI 10 lite (5G) या स्मार्टफोनची किंमत 349 यूरो म्हणजेच 29 हजार 200 रुपये ठेवण्यात आली आहे.
आता हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होईल, हे कंपनीकडून अद्याप सांगण्यात आले नाही.