गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (17:20 IST)

‘हंता व्हायरस’मुळे चीनमध्ये एकाचा मृत्यू, सोशल मी‍डियावर हाहाकार

करोना व्हायरसच्या लागणमुळे जगभरातील लोकं भीतीच्या वातावरण जगत आहे अशात धक्कादायक बाब म्हणजे आता चीनच्या यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
 
या व्यक्तीचा कामावरुन शाडोंग प्रांतांहून बसमध्ये परत येत असताना मृत्यू झाला आहे. आता बसमधील इतर 31 प्रवाशांचीही चाचणी करण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्यावर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
 
चीनच्या शासकीय वृत्तपत्र ग्‍लोबल टाइम्‍सने या घटनेबद्दल माहिती दिली आहे. 
 
तसेच तज्ज्ञांप्रमाणे हंता व्हायस कोरोना व्हायरस एवढा घातक नाही. हा व्हायस उंदीर किंवा गिलहरीच्या संपर्कात आल्याने पसरतो असे सांगण्यात येत आहे.