सध्या सम्पूर्ण देश कोरोनाने त्रस्त झाले आहे. या आजारापासून सुटका मिळविण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे. सर्व संशोधक ह्यासाठीची लस शोधण्यात लागले आहेत. असे असताना कोरोनाशी वाचण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 6 नियमाने घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
चला तर मग जाणून घेउया कोरोना पासून वाचण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी चे नियमाने सेवन करणे किती प्रभावी आहे ते? जाणून घेऊया तज्ञांचा सल्ला...या सर्व गोष्टी लक्षात घेउन आम्ही आहार तज्ज्ञ पायल परिहार यांच्याशी संवाद साधला.
सर्वप्रथम आपण व्हिटॅमिन सी बद्दल बोलू या... याची आपल्या शरीराच्या रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आजारी होण्याचा धोका संभवतो.
व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये संत्री, द्राक्ष, स्ट्राबेरी, कीनू (टेंजरिन), पालक, केळी आणि ब्रोकोली आहे. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आपण व्हिटॅमिन सी चे नियमाने सेवन करायला हवं. एक चांगली गोष्ट अशी आहे की व्हिटॅमिन सी जरी एवढ्या पदार्थांमध्ये आढळतं असेल, तरी ही हे लक्षात ठेवावे की आहारतज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्याचे सेवन करू नये.
व्हिटॅमिन बी 6 : रोग प्रतिकारक प्रणाली मध्ये रासायनिक प्रक्रियेस समर्थन करण्यासाठी महत्वाची भूमिका. कारण व्हिटॅमिन बी 6 आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतं. त्याच बरोबर स्त्रियांमध्ये होणाऱ्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारी चिडचिड, मनस्थिती बदलणे आणि काळजी आणि पीएमएस लक्षणांना कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतं.
कोरोना संसर्गाला टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी, ई, बी 6 चे नियमाने सेवन करणे फायदेशीर असतं. पण ह्याचा सेवन करण्याचा आधी आहारतज्ञाशी सल्ला घ्या. नाही तर जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने ते आपल्याला त्रासदायक होऊ शकत. व्हिटॅमिन बी 6 ने समृद्ध असलेल्या खाद्य पदार्थामध्ये साल्मन आणि टुना मासे, पोळ्या, अक्खे धान्य जसे ओटचे पीठ, ब्राऊन राईस, अंडी, भाज्या, पालेभाज्या, सोयाबीन, शेंगदाणे, दूध, बटाटे आणि चणे यांचा समावेश आहे.
व्हिटॅमिन ई : हे एक शक्तीशाली अँटी ऑक्सिडंट आहे. जे शरीराच्या संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करतं. ह्याचा अर्थ असा आहे की हे पेशींचे फ्री रॅडिकल्स नावाच्या अस्थिर अणुंमुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण करतं.
व्हिटॅमिन ई पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते. हृदयरोगांपासून ते कर्करोगापर्यंत अनेक आरोग्यविषयक त्रासांच्या धोक्याला कमी करण्यास मदत करतं. परंतु जास्त प्रमाणात ह्याचे सेवन केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. जसे अतिसार, मळमळ, पोटात मुरडा येणं, अशक्तपणा, डोकेदुखी, डाग, आणि अजून ही बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.
व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेले खाद्य पदार्थांचे सेवन आपण करू शकता. जसे की बदाम, शेंगदाणे, सूर्यमुखी, हेजलनट्स, मक्का आणि सोयाबीन तेल. सूर्यफुलाचे बियाणे आणि हिरव्या पालेभाज्या जसे पालक आणि ब्रोकोली मध्ये व्हिटॅमिन ई आढळतं.