बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 9 जानेवारी 2020 (16:29 IST)

गरोदरपणात तूप खाण्याचे फायदे, या प्रमाणात करा तुपाचे सेवन

पचन समस्या दूर होतात 
तुपात अँटी-व्हायरल गुणधर्म असल्याने पचन क्रिया सशक्त होते. या व्यतिरिक्त ह्यात फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यास फायदेशीर ठरते. 
 
बाळाच्या विकासास उपयुक्त
गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या तिमाहीतच बाळाच्या वाढीसाठी दररोज 300 कॅलरीची जास्त गरज असते. तुपात कॅलरी असल्यास ते बाळाच्या वाढीस मदत करतात.
 
शरीरास पोषण मिळते
कमी प्रमाणात तूप सेवन केल्यास गरोदरपणात आवश्यक पोषण मिळते. एवढेच नाही तर, ते आपणांस आनंद ठेवते आणि तणावाला दूर करते.  
 
टीप
बाजारातल्या तुपापेक्षा घरातील तूप जास्त फायदेशीर असते.
 
गरोदरपणात, स्त्रीला दिवसभरात 50 ग्रॅम चरबी जेवणात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी तीन ते चार लहान चमचे तूप घेऊ शकता. ह्या पेक्षा जास्त तुपाचे सेवन केल्यास स्त्रीचे आणि बाळाचे वजन वाढू शकते.