गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (08:33 IST)

मंगळवारचा उपवास: या 8 कामाच्या गोष्टी जाणून घ्या

भीती आणि काळजीपासून मुक्ती देणारा मंगळवार. असे करावे व्रत कैवल्य. हिंदू धर्मात मंगळवारच्या उपासाला खूप महत्त्व दिले आहेत. अशी आख्यायिका आहे की विधी विधानाने व्रत कैवल्य केल्याने उपास करण्याच्या सर्व भीती, काळजी दूर होतात. मंगळवारच्या व्रत कैवल्याच्या पूजेची विधी :
 
* मंगळवारी सूर्योदयाच्या आधी उठायला हवं.
* नित्य विधी आटोपल्यावर अंघोळ करून शुचिर्भूत व्हावे.
* या दिवशी लाल रंगाचे कापडं घालणे शुभ मानले आहे. नंतर मारुतींना लाल फूल, शेंदूर, कापडं अर्पण करावी.
 
मंगळवार विशेष : मारुतीचे हे 7 उपाय प्रत्येक संकटातून मुक्ती देणारे.
* मारुतीच्या मूर्ती समोर दिवा लावून मनोमनी हनुमान चालीसा किंवा सुंदर कांडाचे पठण करावे.
* संध्याकाळी बेसनाच्या लाडूंचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवून स्वतः अळणी जेवण करावं.
* मंगळवारचा उपास करणाऱ्यांना या दिवशी ब्रह्मचर्य व्रत पाळायला हवं.
* अशी आख्यायिका आहे की मंगळाचे दोष असणाऱ्यांनी देखील मंगळवारचे उपास करायला हवे. असे केल्यास लाभ होतो.
* शनीची महादशा, अडीच वर्षे किंवा साडेसाती पासून होणाऱ्या त्रासाला दूर करण्यासाठी मंगळवाराचे व्रत कैवल्य प्रभावी मानले जाते.