रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

अँलर्जीचा त्रास असणार्या व्यक्तिंसाठी आहार विहार

अँलर्जीचा त्रास वाढू नये यासाठी खालील विषयांचे पालन करावे.
रात्री जागरण तर दिवसा झोप टाळावी, अति थंड वातावरणाचा सहवास टाळावा, धूळ, उग्र गंध, सुगंधी द्रव्यांचा सहवास टाळावा, पंख्यांचा वापर विशेषत: रात्री टाळावा, मलमूत्र विसर्जनासाठी टाळाटाळ करू नये.
 
आहार : दही, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, मोड आलेले कडधान्य, हरभरा तसेच उडीद डाळीचा वापर, कच्चे सॅलड, साबुदाणा, पोहे, चहा-कॉफी, मांसाहार, बेकरी पदार्थ, फास्ट फूड इत्यादींचा वापर आवश्यक टाळावा. 
 
भूक लागेल त्याप्रमाणे आहार सेवन करावा, अति प्रमाणात आहार सेवन करू नये, तहान जशी लागेल त्याप्रमाणे पाणी प्यावे, अति प्रमाणात पाणी पिऊ नये, फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ तसेच पाण्याचा वापर टाळावा, मद्यपान, धूम्रपान आवश्यक टाळावे.
 
पथ्य : पचण्यासाठी हलके (लवकर पचणारे) अन्न पदार्थांचा वापर करावा. विशेषत: ज्वारीची भाकर, मूग डाळीचे वरण, भात, दोडका, गिलके, भेंडी, पालक, मेथी यांचा दैनंदिन आहारात नियमित वापर करण्याचा प्रयत्न करावा. सुका मेवा वापरावा; परंतु पाण्यात न भिजवता. रुग्णांनी योग्य आहार सेवन केला तसेच औषधांचा नियमित वापर केला तर अँलर्जी पूर्णपणे कायमस्वरूपी बरी होते.