सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (12:05 IST)

विद्यार्थ्यांची कमाल, तयार केले अल्कोहल मुक्त सॅनिटायझर

उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये सध्या कोरोनाचे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशामुळे त्यापासून वाचण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचे आहे. तर दुसरीकडे देऊळ देखील उघडणार आहेत, हे बघता बीएसएनडी शिक्षा निकेतनच्या रसायन विभागातील शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांनी अल्कोहल मुक्त सॅनिटायझर बनवून त्याचे नाव शिनेटायझर ठेवले आहे. 
 
विद्यालय व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार या शिनेटाईझरला देऊळात आणि घराच्या देवघरात देखील वापरू शकता. सांगावयाचे असे की बीएनएसडी शिक्षा निकेतन इंटर कॉलेजचे रसायनशास्त्राचे प्रवक्ते अवनीश मेहरोत्रा यांनी जगातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी असे सॅनिटायझरचे शोध लावून त्याला "शिनेटाईझर" असे नाव दिले आहे. हे बनवणे खूप सोपे आहे आणि हे शंभर टक्के वैज्ञानिक पद्धतीने बनविले आहे. 
 
माहिती देताना शिक्षा निकेतनाच्या रसायनशास्त्रज्ञ अवनीश मेहरोत्रा यांनी सांगितले की प्रत्येकाचा घरामध्ये उपलब्ध असलेले व्हिनेगर, मीठ, आणि बॅटरी सेल, पॉवरबँक पासून हे शिनेटाईझर तयार केले आहे. 
 
ते सांगतात की विद्यालयाचे इयत्ता आठवीतले विद्यार्थी मयंक शुक्ला, शौर्य सैनी, प्रेरित कुमार यांना जगातील सर्व स्वस्त अल्कोहल मुक्त सॅनिटायझर बनवायचे आणि त्याला नवे नाव देण्याचे काम दिले होते, त्यांना मार्गदर्शन दिल्यावर त्यांनी अनेक प्रयोगानंतर या विद्यार्थ्यांनी अल्कोहल रहित शिक्षा निकेतनाच्या व्हायरस रिमूव्हर प्रॉडक्ट "शिनेटाईझर "चे शोध लावले आहे. 
 
अवनीश मेहरोत्रा यांनी सांगितले की अल्कोहल मुक्त शिनेटाईझर बनविण्यासाठी एक लीटर पाण्यामध्ये आठ मिलीग्राम व्हिनेगर, चार ग्राम मीठाचा घोळ तयार करा या घोळाला घरामध्ये असलेले सेल बॅटरी किंवा पॉवर बँक ने 25 मिनिटे विद्युतीकरण करा. विद्युतीकरण करणं अगदी सोपं आहे. सेल बॅटरी किंवा पॉवर बँक च्या वायरचा एक भाग या घोळात 25 मिनिटे टाकून ठेवले की विद्युतीकरण झाले समजा. आपले 100 टक्के मेडिकेटेड व्हायरस रिमूव्हर "शिनेटाईझर" तयार आहे. 
 
"हायपो क्लोरस अम्ल" घोळाचा रंग पिवळा आहे. या अल्कोहल मुक्त शिनेटाईझरला पूजेच्या स्थळी देऊळ, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये त्या जागेची पावित्र्याचे लक्षात घेऊन वापरण्यात घेता येऊ शकतं. 
 
सध्या या शिनेटाईझरच्या 500 मिलीची गिफ्ट पॅक तयार केले जात आहे, मग 100 मिलीचे गिफ्ट पॅक तयार करण्यात येतील. याच शिनेटाईझरने शाळे मधील स्थापित असलेली देवी सरस्वतीच्या प्रतिमा स्थळ आणि मुख्य दारावरील असलेल्या देवळाला सेनेटाईझ केले जाईल.