शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (11:28 IST)

रशियाच्या विजयी दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच भारताचे तिन्ही सैन्य दल

रशियातील मॉस्कोमध्ये पार पडणाऱ्या वर्षिक परेडमध्ये पहिल्यांदाच भारताच्या सैन्याच्या तिन्ही दल सामील होणार आहे. आतापर्यंत या परडेमध्ये केवळ लष्कराचा सहभाग होता. 
 
२४ जून रोजी पार पडणाऱ्या या परेडमध्ये लष्कर, हवाईदल आणि नौदलही सहभागी होणार असून आपल्या ताकदीचं प्रदर्शन करणार आहे.
 
रशियामध्ये दरवर्षी ९ मे रोजी विजय दिवसाच्या निमित्तानं या परेडचं आयोजन केलं जातं. परंतु करोनामुळे यावेळी त्याचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. १९४५ मध्ये 
 
नाझी जर्मनीच्या शरणागती पत्करल्यानंतर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 
 
रशियानं या परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं होतं. परंतु करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान त्या परेडमध्ये सहभागी होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे. 
 
भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे ७५ ते ८० जवान १९ जून रोजी या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.