बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (08:51 IST)

या कारणांमुळे पीरियड्स उशिरा येतात

ताण
तणावाचा पीरियड्सवर खूप परिणाम होतो. ताणामुळे GnRH नावाच्या हार्मोनचे प्रमाण कमी होतं ज्यामुळे ओव्युलेशन किंवा पीरियड्स येत नाही. म्हणून स्वत:ला रिलॅक्स ठेवा आणि नियमित पीरियड्साठी डॉक्टरांशी संपर्क करा.
 
आजार
ताप, सर्दी, खोकला किंवा खूप काळ टिकणार्‍या आजरामुळे पीरियड्स उशिरा येऊ शकतात. हे अस्थायी असतं आणि जसं जसं शरीर निरोगी होतं पीरियड्स नियमित होतात.
 
लाईफस्टाईल
जीवनशैलीत बदल, कामाची शिफ्ट बदलणे, आहार घेण्याची वेळ बदलणे, जागरण, किंवा कश्याही प्रकारे रुटीन बदल्यामुळे पीरियड्स लांबतात. पुन्हा रुटीन सुरु झाल्यावर पाळी देखील नियमित येते.
 
ब्रेस्टफीडिंग
मुलांना ब्रेस्टफीडिंग करवाता अनेक महिलांना पीरीयड्स येतच नाही. 
 
बर्थ कंट्रोल पिल्स
बर्थ कंट्रोल पिल्स किंवा इतर औषधांमुळे पीरीयड्स सायकल गडबडते. अशात डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 
लठ्ठपणा
वजन वाढत असल्या पीरीयड्स नियमित येत नाही.
 
प्री मेनोपॉज
मेनोपॉज येण्यापूर्वी महिलांच्या शरीरात आंतरीक रुपात अनेक बदल होत असतात. यामुळे पीरीयड्स उशिर येतात.
 
कमजोर किंवा कमी वजन असणे
आपल्या शरीरात पुरेसे फॅट्स नसल्यास पीरीयड्स लांबतात. नियमित पाळी यावी यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक असतं.
 
थायराइड
थायराइडसंबंधी समस्या असल्या याचा थेट परिणाम पाळीवर होतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.