Dharma Sangrah
✕

धुळे – मुंबई एक्सप्रेस सुरु, ‘असे’ आहे वेळापत्रक, ‘या’ स्टेशनवर थांबणार

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (08:48 IST)
 
या नवीन गाडीला खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे रेल्वे स्थानकातून सकाळी साडेसहा वाजता हिरवा झेंडा दाखविला. धुळ्याच्या महापौर प्रतिभा चौधरी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, प्रवासी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. मध्य रेल्वेने पुणे-नाशिक-भुसावळ ही थेट पुण्याला जाणारी गाडी दौंड-मनमाडमार्गे अमरावतीला नेण्यास सुरुवात केल्याने नाशिककरांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केला. आता धुळे-मुंबई गाडी सुरू करून दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.
 
असे आहे वेळापत्रक:
दादर-धुळे दैनिक एक्स्प्रेस (11011) ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी बारा वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री 20.55 वाजता पोहोचेल. धुळे-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (11012) ही गाडी धुळ्याहून दररोज सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी दुपारी 14.15 वाजता पोहोचेल.
 
या स्थानकांत थांबणार:
दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड या रेल्वे स्थानकांत या गाडीला थांबा असेल. या गाडीला १६ डबे असून, त्यात एक वातानुकूलित चेअर कार, १३ नॉनएसी चेअर कार (पाच आरक्षित आणि आठ अनारक्षित), तर एक जनरल सेकंड क्लासच्या डब्याचा समावेश आहे.
 




Edited by- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नंदुरबार जिल्ह्यात एरंडीच्या बिया खाल्ल्याने मुलीचा मृत्यू, सात जण रुग्णालयात दाखल

गुरुवारी पहाटे नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

सुनेत्रा पवार गटातील २२ आमदार पक्ष सोडणार, संजय राऊत यांचा दावा

महाराष्ट्रातील लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले

LIVE: महाराष्ट्राच्या लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग पुरस्कार मिळाला

पुढील लेख
Show comments