दिवाळीत फुकट्या रेल्वेप्रवाशांकडून पावणे 4 कोटी वसूल  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  मध्य रेल्वेने भुसावळ विभागात दिवाळीच्या सण उत्सवात गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवास करणाऱ्या 41 हजार रे्ल्वे प्रवाशांकडून सुमारे पावणे चार कोटीचा दंड वसूल केला.
				  													
						
																							
									  
	
	मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील 537 तिकीट तपासणीस सहभागी झाले.
				  				  
	 
	9 ते 15 नोव्हेंबर अशा आठवडाभरात दिवाळीसाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीटांची शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात, भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून भुसावळ विभागाचा नवीन विक्रम प्रस्थपित केला.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	दिवाळी सुट्टीच्या या काळात विनातिकीट, अनधिकृत प्रवास करणाऱ्या 41 हजार 894 प्रवाशांकडून 3 कोटी 73 लाखाचा दंड वसूल करण्यात आला.
				  																								
											
									  
	
	त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण 7370 प्रवाशांकडून 68.85 लाख रुपये दंड वसूल केला.
				  																	
									  
	 
	Edited by- Ratnadeep Ranshoor