गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (11:23 IST)

Nashik Crime News: फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

murder
राज्यात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. अशातच नाशिकमधूनन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  
 
 याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू असतानाच भयंकर हत्येने नाशिक जिल्हा हादरुन गेला आहे. नाशिकच्या पथाडी गावात फटाके उडवण्याच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. गौरव अखाडे असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच पोलिसांकडून एका संशयित आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सध्या सुरू आहे.