मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (15:30 IST)

धुळे पोलिसांनी ९० तलवारी हस्तगत करत चार जणांना ताब्यात घेतलं

Dhule police seized 90 swords and arrested four persons
धुळे - मुंबई-आग्रा हायवेवर सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच ०९ सीएम ००१५ला सोनगीर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र, परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून विचारणा केली. त्यांनतर गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता पोलिसांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. गाडीत तब्बल ९० तलवारी आढळून आल्याने सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींच्या सोबत ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहे.
 
ताब्यात घेतलेल्या आरोपी हे चित्तोडगड येथून ९० तलवारी जालना येथे घेऊन जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, यामागील त्यांचा हेतू काय होता व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा तपास सध्या धुळे पोलीस करीत असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
सदर कारवाईत सोनगीर पोलिसांनी ७ लाख १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील अधिक तपास सोनगीर पोलीस करीत आहे. सदरची कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पथकासह पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व विभागीय पोलिस उपअधीक्षक प्रदीप माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.