पालघर : आरक्षणासाठी OBC समाज आक्रमक
पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ओबीसी समाज असूनही तो शून्य टक्के असल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षीय ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ओबीसी हक्क समितीच्या वतीनं 29 एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
अतिशय शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना शासनास द्यावयाचं निवेदन सुपूर्त करण्यात येईल. मोर्चाकरीता पालघर जिल्ह्यातील तालुक्यामधील 70 ते 75 हजारांच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. अशात 29 एप्रिल रोजी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत क्षेत्र वाहतुकीकरीता बंद करण्यात येणाऱ्या पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहे.