1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (12:17 IST)

मुंबईत दुकानांच्या पाट्यांवर लवकरच कारवाई

mumbai mahapalika
मुंबईत दुकानांच्या अमराठी पाट्यांवर लवकरच कारवाई सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेने मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरु केली असून मुंबईत सुमारे साडेचार लाख दुकाने पालिकेच्या नजरेत आहे.
 
राज्य सरकारने दुकानांवर ठळक मराठीत नामफलक बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाणार आहे. यात दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत, देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असल्यास त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असावे. याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.  
 
पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने व अस्थापना कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. नोटिशीनंतरही नामफलकात बदल न केल्यास न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाईल.