बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:44 IST)

परमबिर सिंग पळाले की पळवून लावले ? नवाब मलिक यांचा सवाल

अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय, आरोप लावणारे परमवीर सिंग फरार आहेत. ही सगळी राजकीय कारवाई असून सरकारला बदमान करण्यासाठी आता अनिल परब यांचा नंबर असे म्हणत आहेत. हे नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. परमबिर सिंग पळाले की पळवून लावले ?असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. 
 
जसमीन वानखेडे यांचे एक व्हाट्सएप chat माझ्याकडे आहे. लेडी डॉन या वसुलीच्या धंद्यात सहभागी आहे. वानखेडेवर कारवाई होणार त्या दिवशी लोक समोर येऊन बोलणार. लोकांनी समोर यावे आणि बोलावे. एवढंच नव्हे तर नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप देखील केले आहेत. 'माझ्या जावायाकडे वि वि सिंग, एन सी बी अधिकारी यांनी land क्रूझर गाडी मागितली, असा गौप्य स्फोट देखील त्यांनी केला आहे. 
 
केंद्र सरकारच्या यंत्रणा संस्थांचा वापर करून राज्याला बदनाम भाजपकडून केले जात आहे. जे बंगालमध्ये सुरू होते ते महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपात गेलेले लोक म्हणतात आम्हाला आता सुखाची झोप लागते, असा खोचक टोला देखील नवाब मलिकांनी लगावला आहे.