शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (16:13 IST)

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला

दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला त्याचे काहीच भान नसते. या दारूच्या व्यसनामुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहे. तरी या दारूचे व्यसन लोकांना असतेच. दारूच्या नशेत एका बापाने नात्याला उध्वस्त करणारी काळिमा फासणारी धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेत विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत  घडली आहे. येथे दारूच्या नशेत एका नराधमी बापाने आपल्या पोटच्या 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि आपल्या 8 महिन्याच्या निरागस मुलीला दारू पाजल्याचे घाणेरडे कृत्य केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका नराधमी बापाने आपली पत्नी ऑक्टोबर महिन्यात गावी गेली असता 9 वर्षाच्या मुलीला अंघोळ घालण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. आई गावावरून आल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. आईने या वर दुर्लक्ष केले नंतर मुलगी सतत रडायची  आईने तिला विचारले तेव्हा तिने घडलेले सांगितले. त्यावर बायकोने आपल्या पतीला विचारल्यावर ती लहान आहे तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. म्हणून तिला गप्प केले. ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा बेडरूम मधून रात्रीच्या वेळी मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यावर सकाळी आईने मुलीला रात्री रडण्याचे कारण विचारले असता वडिलांनी माझ्यासोबत असे केले एवढेच नव्हे तर त्या नराधमाने आपल्या 8 महिन्याचं चिमुकलीला दारू पाजली. आणि पत्नीला मारहाण केली. पत्नीने कंटाळून शुक्रवारी विष्णू नगरच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या नराधमी नवऱ्याची तक्रार केली. पोलिसांनी 49 वर्षीय आरोपीला पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.