बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (15:50 IST)

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चक्क आत्महत्या करण्यासाठीची परवानगी मागितली आहे.  याचे कारण त्यांनी त्यांचे पती कोंडाजी चाबके यांच्या शासकीय सेवानिवृत्ती नंतर प्रशासनाकडून पेंशन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले आहे. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. या महिलेची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना या पेंशनचेच आधार आहे.  पती जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जव्हार पंचायत समिती येथे  स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर होते. ते शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर मिळणाऱ्या पेंशन ला मिळविण्यास त्यांनी खूप प्रयत्न केले असता त्यांना निराशा मिळाली .पेंशन देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. आता पतीच्या निधनानंतर तरी त्यांना पेंशन मिळावी या साठी त्यांनी अनेक वेळा पत्र व्यवहार देखील केले. परंतु त्यांना अद्याप पेंशन मिळाली नाही. अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली. त्यांनी स्मरण पत्रात  लिहिले की मी या पूर्वी देखील मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठविले होते.पण त्यावर काही कारवाई केली गेली नाही. आपण यावर 1 नोव्हेंबर पर्यंत काही कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करणार आणि आपण मला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी. असे महिले ने पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविले आहे.