1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (12:54 IST)

मुंबईजवळ पालघरमध्ये होणार विमानतळ, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

मुंबईजवळ असलेल्या पालघरमध्ये विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 
मुंबई विमानतळाचा वापर पूर्ण क्षमतेनं होतं आहे. त्यानंतर नवी मुंबई विमानतळावरील सेवाही कमी पडणार आहेत. त्यामुळं मुंबईजवळ पालघरमध्ये हे तिसरं विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले.
 
कोकणातील सीआरझेड बाबतही जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे, असंही ठाकरे म्हणाले.