1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 6 मे 2025 (19:13 IST)

बुलढाण्यात डिझेल टँकर उलटला,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, गावकऱ्यांनी डिझेल लुटून नेले

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर मध्ये मंगळवारी 6 मे रोजी सकाळी खामगाव मेहकर महामार्गावर गोमेधर फाट्याजवळ रस्ता अपघात घडला. मुंबईहून येणारा एक वेगाने धावणारा डिझेल टँकर नियंत्रणा बाहेर गेला आणि उलटला.
टँकर जड आणि इंधनाने भरलेला असल्याने, तो उलटताना मोठा स्फोट झाला, ज्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. हे ऐकताच आजूबाजूच्या गावातील लोक घटनास्थळी धावले. सुरुवातीला गावकऱ्यांना वाटले की चालक आणि क्लिनरचा मृत्यू झाला असावा. पण लोक टँकरच्या केबिनमध्ये पोहोचताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, दोघेही जखमी झाले होते, पण सुदैवाने सुरक्षित होते.
गावकऱ्यांनी दोघांनाही बाहेर काढले आणि मदत केली.  काही वेळातच अपघाताची बातमी परिसरात पसरली. यानंतर, गावकऱ्यांचा जमाव घटनास्थळी जमला - पण यावेळी मदत करण्यासाठी नाही, तर मोफत डिझेल लुटण्यासाठी. सर्वांनी सोबत प्लास्टिकचे डबे, ड्रम, बादल्या आणि इतर भांडी आणली.

मुले, तरुण, वृद्ध आणि महिला सर्वजण टँकरमधून डिझेल भरू लागले. क्षणातच गोंधळ माजला. धक्काबुक्की शिवीगाळ सुरु झाली. 
काही मिनिटांपूर्वी ज्या गावकऱ्यांनी या दोघांचे प्राण वाचवले होते तेच आता टँकरमधून डिझेल काढत होते. जखमी चालक आणि क्लिनर हात जोडून विनवणी करत होते, "कृपया डिझेल घेऊ नका, ते बेकायदेशीर आहे." पण त्याचे ऐकायला कोणीही तयार नव्हते. 
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गावकऱ्यांनी टँकरमधून हजारो लिटर डिझेल भरले होते आणि तेथून निघून पळून गेले.
Edited By - Priya Dixit