शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 20 मे 2023 (09:29 IST)

दिगंबर दराडेंच्या मराठी पुस्तक ऋषी सुनकला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे

Rishi Sunak Marathi Book
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची मोठ्या संख्येत विक्री होत आहे. अवघ्या आठ दिवसांमध्ये २००० प्रतींची तिसरी आवृती सुरु करण्यात आली. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. या पुस्तकाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.
 
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.
 
एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.
 
माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, "ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये आम्ही तिसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे."

"मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे", अशी ऋषी सुनक यांनी प्रतिक्रिया दिली.

Edited By - Ratnadeep ranshoor