सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (09:14 IST)

जि. प., पं. स. साठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

voting
आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यात एका जि. प. मतदारसंघाची व त्या अंतगर्तगत दोन पं. स. मतदारसंघांची वाढ झाली आहे. परिणामी यापूर्वीच्या जि. प. व पं. स. मतदारसंघांतील गावांमध्ये बदल झाले आहेत. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना मागविण्यात आल्या असून कणकवली तालुक्यातील हरकती, सूचना ८ जूनपर्यंत तहसीलदार यांच्याकडे सादर करायवच्या आहेत.
कणकवली तालुक्यातील जि. प. मतदारसंघ अंतर्गत दोन्ही पं. स. मतदार संघामध्ये गावे पुढीलप्रमाणे : खारेपाटण जि. प. मतदारसंघामधील खारेपाटण पं. स. मतदारसंघामध्ये खारेपाटण, शिक्षा पेठ, बंदर गांव, संभाजीनगर, काजिर्डा, वायंगणी, चिंचवली, नडगिवे तर वारगांव पं.स. मतदारसंघामध्ये कुरंगवणे, बेर्ले, शेर्पे, शिडवणे, वारगांव, साळीस्ते या गावांचा समावेश आहे.
कासार्डे जि.प. मतदारसंघामधील कासार्डे पं. स. मतदारसंघामध्ये कासार्डे, आनंदनगर, धारेश्वर, उत्तर गावठण, जांभुळगाव, दाबगाव, आवळेश्वर, नाग सावंतवाडी, पियाळी तर तळेरे पं. स. मतदारसंघामध्ये तळेरे, औदुंबरनगर, दारूम, ओझरम, आयनल, कोळोशी या गावांचा समावेश आहे.
नांदगांव जि. प. मतदारसंघातील नांदगाव पं. स. मतदारसंघामध्ये नांदगाव, असलदे, तोंडाला, वशी तर ओटव पं. स. मतदारसंघामध्ये ओटव, माईण, भरणी, सावडाव, बेळणेखुर्द, तिवरे, डामरे या गावांचा समावेश आहे.
फोंडा जि. प. मतदारसंघातील फोंडा पं. स. मतदारसंघामध्ये फोंडा, दक्षिण बाजारपेठ तर लोरे पं. स. मतदारसंघामध्ये लोरे, गांगेश्वर, नविन कुर्ली, वाघेरी,
लिंगेश्वर, मठ खुर्द, उत्तर बाजारपेठ, ब्रह्मनगरी, घोणसरी या गावांचा समावेश आहे.
हरकुळ बुद्रुक जि. प. मतदारसंघातील हरकुळ बुद्रुक पं. स. मतदारसंघामध्ये हरकुळ बुद्रुक, नागवे, करंजे तर हरकुळ खुर्द पं. स. मतदारसंघामध्ये हरकुळ खुर्द, करूळ, कोंडये, भिरवंडे, रामेश्वर नगर, नेहरूनगर, सुभाषनगर, गांधीनगर, कुंभवडे या गावांचा समावेश आहे.