1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. diwali in masan

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्मशानात केली पोलिसांनी दिवाळी साजरी

मनमाड तालुक्यात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी स्मशानात साजरी केली आहे. अनेक वर्षापासून लोकांमध्ये अमावस्या असलेल्या स्मशान बाबत अनेक गूढ गोष्टी सांगण्यात येत असल्या तर भूत प्रेत आदि गोष्टी करत भीती पसरवली जाते.म्हणूनच या जागेबाबत असलेल्या अंधश्रद्धा दूर करून स्मशानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद उपभोगता यावा या साठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्मशानात स्वच्छता करून हजारो पणत्या प्रज्वलित केल्याने स्मशानात दिव्यांचा लखलखाट पसरला होता. या दिवाळीमुळे लोकांची अंधश्रद्धा नक्कीच कमी होईल आणि लोक भिणार नाहीत असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. 
पुढील लेख
भारतीय हॉकीपटूंचा दिवाळ सण