शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: कौंटन , रविवार, 30 ऑक्टोबर 2016 (07:32 IST)

भारतीय हॉकीपटूंचा दिवाळ सण

देशभरात दीपावलीचा सण साजरा होत असताना माजी विजेत्या भारतीय हॉकी संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा पेनल्टी शूटआऊटवर ५-४ असा पराभव करून आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि भारतीयांच्या आनंदात भर घातली. दुखापतीतून तंदुरुस्त होऊन परतलेला कर्णधार पी. आर. श्रीजेश भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 
 
उभय संघांमधील साखळीचा सामना १-१ अशा बरोबरीत सुटला होता. शनिवारी खेळला गेलेला उपांत्य फेरीचा सामनाही २-२ अशा बरेाबरीत सुटला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा निकष लावण्यात आला. त्या आधी सामन्याच्या दहाव्या मिनिटाला तलविंदर सिंगने रिव्हर्स हिडद्वारे भारतातर्फे पहिला गोल केला. सामन्यात बरोबरी करण्याची संधी कोरियाने गमावली. दुसर्‍या सत्रात सेवो ईनवूने गोल करून दक्षिण कोरियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा दोन्ही संघांनी एकेक गोल केला होता. त्यानंतरच्या सत्रात पेनल्टी स्ट्रोकवर यँग झुनने भारताच्या गोलरक्षकाला चकवत गोल केला आणि दक्षिण कोरियाने प्रथमच २-१ अशी आघाडी घेतली. भारताचा आघाडीचा खेळाडू आणि हुकमी एक्का रमणदीपने आपला करिष्मा दाखवत गोल केला आणि सामन्यात २-२ अशी बरोबरी निर्माण झाली. ही कोंडी फोडण्यास दोन्ही संघांना वेळच मिळाला नाही.
 
पंचांनी शिट्टी वाजवली आणि सामना २-२ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा निकष लावण्यात आला. भारतातर्फे पाचही खेळाडूंनी गोल केल्यामुळे दक्षिण कोरियाला अखेरच्या प्रयत्नात गोल करणे आवश्यक होते. कर्णधार आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने कोरियाच्या खेळाडूचा प्रय▪रोखला आणि भारतीय हॉकीपटूंनी मैदानावर एकच जल्लोष केला.