सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (15:01 IST)

डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर्स सेल सरसावले

- आपत्कालीन अलार्म सिस्टीम बसवण्याची जे. जे. महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली मागणी

नुकत्याच जे.जे.रूग्णालयात घडलेल्या घटनेत निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलचे प्रतिनिधी आज जखमी डॉ. अतिश व डॉ. शाल्मली यांना भेटले व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी जे.जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ननंदकर सर यांच्यासोबत चर्चा करून इमर्जन्सी अलार्म सिस्टीम तसेच प्रत्येक मजल्यावर एक सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. तसेच मार्डचे अध्यक्ष डॉ. संग्राम यांना भेटून डॉक्टर्सच्या सुरक्षिततेसाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे जाहीर केले व अधिष्‍ठातांकडे निवेदन सुपूर्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डॉक्टर सेलच्या शिष्टमंडळात डॉ. शिवदास भोसले (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ. किरण देशमुख (प्रदेश सचिव) डॉ. रिना मोकल (अध्यक्ष उत्तर मुंबई) व डॉ. निरज शहा इ. चा समावेश होता.