गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (21:14 IST)

डॉक्टरांवर हल्ले होत असून सरकार त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही

राज्यात करोनाविरोधातील लढ्यात अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. करोना योद्धे म्हणून गौरवलं जात असलं तरी अनेक ठिकाणी रुग्ण तसंच रुग्णांच्या कुटुंबीयांकडून डॉक्टरांना मारहाण होत आहे. दरम्यान याच मुद्द्यावरुन मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं आहे. रुग्ण तसंच रुग्णांच्या कुटुंबीयांकडून डॉक्टरांवर हल्ले होत असून महाराष्ट्र सरकार त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.
 
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. १३ मे रोजी हायकोर्टाने राज्य सरकारला डॉक्टर तसंच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी विचारणा करत किती एफआयआर दाखल केले तसंच त्यांच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचलली याची माहिती मागितली होती. यासंबंधी राज्य आरोग्य विभागाच्या उपसचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर खंडपीठाने हे मत नोंदवलं.