मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (16:10 IST)

यापुढे अशी पोकळ आव्हान शिवसेनेला देऊ नका : वरुण सरदेसाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे.दरम्यान भाजप आमदार आणि राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी शिवसैनिकांना आव्हान दिलं.त्यांनी ट्वीट करत ‘सिंहाच्या हद्दीमध्ये पाऊल ठेवायची हिंमत करु नका,आम्ही तुमची वाट बघतोय’,असं आव्हान नितेश राणे यांनी केलं होतं.तेच आव्हान स्विकारतं युवासैनिक नारायण राणे यांच्या बंगल्याखाली पोहोचले. मात्र यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.त्यानंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नितेश राणे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
 
‘ या लोकांनी घराखाली येऊ दाखवा, असं आव्हान केलं होत. युवासैनिक घराखाली आले. आमच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केलाय. एवढे घाबरट आहेत की,पोलिसांचा वापर करून ते लपलेत.पोलिसांना लांब करा आणि दोन हात करा.आमची दोन हात करण्याची तयारी होती हे घाबरून गेले.यापुढे अशी पोकळ आव्हान शिवसेनेला देऊ नका,’ असे वरुण सरदेसाई म्हणाले.
 
पुढे वरुण सरदेसाई म्हणाले की, ‘गेली अनेक महिने आम्हाला ते चिथवण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही संयम बाळगला होता. काल जेव्हा त्यांनी आमचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांच्यावर हात उचलण्याची भाषा केली तेव्हा युवासैनिक आक्रमक झाले. आज सुद्धा त्यांनी आव्हान दिलं होत बंगल्याखाली या.आम्ही आव्हान स्विकारलं. जर आव्हान द्यायचं होत, तर दोन हात करायला पाहिजे होते.पोलिसांच्या मागे लपायला पाहिजे नव्हते.’