सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (15:48 IST)

रत्नागिरी कोर्टाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नारायण राणे यांच्यावर राज्यातील काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र याचदरम्यान नारायण राणे यांना रत्नागिरी कोर्टाने मोठा झटका दिला आहे.रत्नागिरी कोर्टाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. 
 
काल, सोमवारी रायगड जिल्ह्यातील महाड पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी कानशिलात लगावण्याचे वक्तव्य केले.याचा वक्तव्याप्रकरणी राज्यातील चार ठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक येथे एक, पुणे येथे एक आणि महाड येथे दोन गुन्हे नारायण राणेंविरोधात दाखल झाले आहेत.त्यामुळे सध्या नारायण राणे यांना अटक होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे.पण याच अनुषंगाने नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.मात्र राणे यांचा अटकपूर्ण जामीन रत्नागिरी सत्र कोर्टाने फेटाळला आहे.नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टाकडून दिलासा न मिळाल्यानंतर आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.