सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (22:01 IST)

त्या चुल्लूभर पाणी में डूब जाव म्हणतो ना आपण.. जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या

sanjay raut
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पेटला असताना  यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्नाटक सरकारने सोलापुरातील गावांना कर्नाटकात येण्याचं आमंत्रण दिले. या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणी सोडण्यासाठी खेळी खेळात महाराष्ट्रातील गावांना आपल्याकडे ओढण्याचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे. तेव्हा  ‘त्याच पाण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही जलसमाधी घेतली पाहिजे’, असा हल्लाबोल राऊतांनी  नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
 
कर्नाटकाने सोडलेल्या पाण्यातच आणि उपमुख्यमंत्री यांनी जलसमाधी घ्यावी. चुल्लूभर पाण्यात डूबावं, कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तोंडावर थुकतोय. असा संताप राऊतांनी  व्यक्त केला आहे. ‘या महाराष्ट्रावर अशा पद्धतीने गेल्या ५० ते ५५ वर्षात आक्रमण झालं नाही. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री डिवचतोय, आव्हान देतोय तुम्हाला. ते जे पाणी सोडलंय ना, त्या चुल्लूभर पाणी में डूब जाव म्हणतो ना आपण.. जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या. तुम्हाला स्वाभिमान असेल तर, असं राऊत यांनी म्हटले.
 
काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजयांच्याविषयी सतत वादग्रस्त वक्तव्य यावरही यावेळी संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. ‘शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. शिवाजी महाराज यांचा अपमान हा राज्याचा अपमान नाही का? विखें पाटीलांनी विधान केले होतं, उगाच भावना भडकवितात म्हणून हा देखील अपमान नाही का? मोदींना रावण म्हटलेलं हा गुजरातचा अपमान होतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्याचा अपमान नाही का ? मुख्यमंत्री आम्हाला काय सांगताय तीन महिन्यापूर्वी आम्ही क्रांती केली. शिवरायांचा रोज अपमान होत आहे आता काय झालं, त्या क्रांतीचे वांती झाली का ?’ असा घणाघाती सवाल राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
 
मेरा बाप गद्दार है...
मी खोकेवाला खासदार नाही. दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर गोंदले होते मेरा बाप चोर है, तसं जे आमदार, खासदार सोडून गेले त्यांच्या कपाळावर मी गद्दार आहे असा शिक्का बसलेला आहे. त्यामुळे यांचे नातेवाईक, पोरं यांच्या बायका उद्या लोकं म्हणतात हे गद्दार आहेत. पिढ्यान पिढ्या यांची गद्दारी यांना शांत बसू देणार नाही असं सांगत  शिंदे गटावर बोचरी टीका केली.  
 
पुढील साडे ३ महिन्यात सरकार पडू शकतं
३ महिन्यापासून क्रांती घडली हे कितीवेळा सांगणार? पुढच्या साडे ३ महिन्यात ते पडू शकते. राजकारण हे चंचल आहे. लोकशाहीत बहुमत त्यापेक्षा चंचल आहे. ज्याप्रकारे तुम्ही राजकीय डाव खेळताय त्यात कुणीही कुणाचं नसतं याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच येईल. मी खात्रीने सांगतो. मी बोलतोय त्यात तथ्य आहे असा दावा संजय राऊतांनी केला. 
 
या  दौरयात राऊत यांनी बॅट हाती घेत क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी केल्याचे बघायला मिळाले. नविन नाशिक येथील संभाजी स्टेडियमवर आयोजीत क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत यांनी उदघाटन केल्यानंतर क्रिकेट खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. राऊत यांनी बॅट हाती घेत क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. 
Edited by : Ratnadeep Ranshoor