मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 5 जुलै 2021 (23:55 IST)

रायगडमध्ये 293 किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त

रायगड जिल्ह्यातील उरण येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट बंदरात महसूल गुप्तचर संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत DRI च्या अधिकाऱ्यांनी तब्बल 879 कोटी रुपये किमतीचे तब्बल 293 किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. ही देशातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. अमली पदार्थांचा एवढा साठा अफगाणिस्तान इराणमार्गे भारतात आणला गेला आहे. 
 
याप्रकरणी DRI च्या अधिकाऱ्या संबंधित आरोपींनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू केली आहे. संबंधित आरोपींनी यापूर्वीही या मार्गानं मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आणलेले हे अमली पदार्थ रायगडमधून पंजाबला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी DRI च्या अधिकाऱ्यांनी मुख्य आयातदाराला अटक केली