संबंधित माहिती
- दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल; "ही" धक्कादायक आकडेवारी आली समोर
- Ank Jyotish 12 डिसेंबर 2023 दैनिक अंक राशीफल,अंक भविष्य 12 December 2023 अंक ज्योतिष
- शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात मिळणार अंडी-केळींचा आहार - दीपक केसरकर
- मोहन यादव : ज्यांच्या नावाची साधी चर्चाही नव्हती, तेच बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
- महाराष्ट्रातल्या ‘ISIS मोड्यूल’वर NIA च्या कारवाईनं निर्माण केलेले प्रश्न
आ. दुर्राणी, आ. मुटकुळे यांचे संचालकत्व रद्द
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. बाबाजानी दुरार्णी, भारतीय जनता पार्टीचे आ. तानाजीराव मुटकुळे यांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधकांनी आज रद्द केले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत या दोघा आमदार महोदयांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्या दोघांच्या सहकारी संस्थेवर बँकेची मोठी थकबाकी होती. सहकारी संस्थेवरील थकबाकी असताना सुद्धा या दोघांनी माहिती लपवली व निवडणूक रिंगणातून संचालकत्व मिळवले. दरम्यान या दोघांच्या या कृतीविरोधात बँकेचे माजी संचालक तथा आ. दुर्राणी यांचे प्रतिस्पर्धी अॅड. स्वराजसिंह परिहार यांनी सहकार खात्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची सहकार खात्याने गांभीर्याने दखल घेतली. पाठोपाठ सुनावणी अखेर बँकेचे या दोघांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी सोमवारी सकाळी एका निर्णयावर निर्णयाद्वारे रद्दबातल केले.
